व्यापाऱ्याला गाठले, पळवले आणि बदडले !

Foto
बनावट नोटांच्या वादातून ७ लाखांची मागितली खंडणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) पडेगाव परिसरातील चौसष्टवर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करून लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बनावट नोटांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून हे अपहरण घडल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत कारवाई करत येवला परिसरातून पीडिताची सुटका केली. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली
असून मुख्य आरोपी फरार आहे. जनार्दन साहेबराव उगले (३८, रा. येवला, जि. नाशिक) आणि विलास दादा आव्हाड (२२,
रा. पारेगाव रोड, येवला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी राजू कनघरे हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफिसा आजिज कासकर यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, ५ मे रोजी सकाळी राजू कनघरे याने आजिज याकुब कासकर यांना फोन करून बाहेर बोलावले. त्यानंतर कासकर हे मेहुणा गौतम सुर्वे, चालक सचिन तसेच मजिद शेख आणि इम्राण शेख यांच्यासह बोलेरो वाहनातून बाहेर पडले. मात्र दुपारपर्यंत संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, दुपारी कासकर यांनी पत्नीला फोन
बनावट नोटांच्या व्यवहारातून वाद
पोलिस तपासात कासकर आणि राजू कनघरे यांच्यात बनावट नोटांच्या व्यवहारातून वाद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघे पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कात होते. उगले यांना ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून कासकर यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र ना नोटा दिल्या, ना पैसे परत केल्याने वाद वाढला. अखेरीस तडजोडीत ७ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम न मिळाल्याने अपहरणाचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
करून आपणास येवला परिसरात नेले असून आरोपी ७ लाख रुपयांची मागणी करत असल्याचे
सहा तासांत सुटका; स्कॉर्पिओ जप्त
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छावणी पोलिसांच्या मदतीने येवला येथे धाव घेतली. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत पीडिताची सुटका केली. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, सहायक फौजदार दिलीप मोदी, प्रकाश गायकवाड, हवालदार अशरफ सय्यद, संतोष चौरे, रोहित जाधव आदींनी सहभाग घेतला.
शिक्षकासह सावकारीचा धंदा ?
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक आरोपी जनार्दन उगले हा जिल्हा परिषदेत शिक्षक असून एसटी बसस्थानक परिसरातील पार्किंगचे टेंडर दुसऱ्याच्या नावावर चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो सावकारी व्यवसायही करत असल्याची चर्चा आहे. आव्हाड हा त्या पार्किंग ठिकाणी पावत्या फाडण्याचे काम करत असल्याचे समजते. पोलिस या सर्व बाबींचा अधिक तपास करत आहेत.
सांगितले. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही त्यांनी कळवले. तपासात आरोपींनी कासकर यांना येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरातील मंदिरामागील खोलीत डांबून ठेवल्याचे समोर आले.
त्यानंतर त्यांना जगदंबा भक्तनिवास येथे हलवण्यात आले. या काळात आरोपींनी त्यांच्यावर मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाणीनंतर आरोपींनीच त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार केल्याची माहितीही समोर आली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions